esakal | औरंगाबादमध्ये वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीचे अजून नऊ प्रकल्प उभारणार

बोलून बातमी शोधा

oxygen plant
औरंगाबादमध्ये वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीचे अजून नऊ प्रकल्प उभारणार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: दिल्लीत ऑक्सिजनची भीषण परिस्थिती पाहता औरंगाबाद व मराठवाड्याची स्थिती थोडी दिलासादायक आहे. या दिलाशात ‘एअरऑक्स’ या वातावरणातून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या कंपनीने मोठी भर घातली आहे. या कंपनीने विविध रुग्णालयात आधी नऊ व आता नव्याने नऊ ऑक्सिजन जनरेट प्लांट उभारणे सुरु केले आहे. नव्या प्लॉंटमुळे १४ ते १८ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होऊ शकेल. ही मराठवाड्यासाठी सुखद बाब आहे.

ऑक्सिजनचा दुष्काळ दूर सारण्यासाठी औरंगाबादचे व ‘एअरऑक्स’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय जैस्वाल सरसावले आहेत. देशभरात ६०० हून अधिक ऑक्सिजन जनरेटर विविध हॉस्पिटलमध्ये उभारले आहेत. प्लॉंट निर्मितीसाठी इतर राज्यातून त्यांच्याकडे मोठी मागणी आहे. परंतू त्यांनी औरंगाबादला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. सध्या नऊ प्रकल्प उभारले असून याची क्षमता १० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीची आहे. अन्‍य नऊ ठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे.

हेही वाचा: कोरोनावरील लस घेतल्यानंतर 5 गोष्टी टाळा; साईड इफेक्ट्सबाबत WHO ने काय सांगितलं?

- या जनरेटरद्वारे जागेवरच ऑक्सिजननिर्मिती होते.

- परिणामी पुरवठा खंडित होण्याची भीती नाही.

- खोलीत अथवा गच्चीवरदेखील हा प्लांट उभारता येतो.

- यात कुठल्याही प्रकारचे हानिकारक वायू, द्रव्य अथवा वस्तूंचा वापर होत नसल्याने सुरक्षित.

- वैद्यकीय वापरासाठी हा ऑक्सिजन संबधित यंत्रणेने प्रमाणित केलेला आहे.

- आपल्याला हव्या त्या क्षमतेचा ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारता येऊ शकतो.

औरंगाबादच नव्हे देशात विविध हॉस्पिटलकडून ऑक्सिजन जनरेटर प्लांटची मागणी होत आहे; पण साधनसामग्री मर्यादित उपलब्ध आहे. इतर राज्यातून अधिक दर देऊन प्लांटची मागणी होत आहे, परंतू आधी औरंगाबादला ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्राधान्य देत आहोत.

-संजय जैस्वाल, एमडी, एअरऑक्स

हेही वाचा: परीक्षेत मार्क कमी पडल्याने १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

घाटीला २८ लाखांचा निधी

घाटीत असंख्य गरजू रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या रुग्णांसाठी नऊ लाख लिटर प्रतिदिन ऑक्सिजन निर्मिती क्षमता असलेला दीड कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी घाटीला ‘सीएमआयए’मार्फत २८ लाख रुपयांचा निधी दिला आहे.