esakal | सुखद! पाच महिन्यानंतर महिलेला मिळाले चोरीला गेलेले मंगळसूत्र
sakal

बोलून बातमी शोधा

mangalsutra

सुखद! पाच महिन्यानंतर महिलेला मिळाले चोरीला गेलेले मंगळसूत्र

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : दुचाकीवर Aurangabad जाणाऱ्या विवाहितेचे ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण दोन आरोपींनी हिसकावले होते. या महिलेचे गंठण पोलिसांनी सन्मानपूर्वक परत केले आहे. ही घटना ७ फेब्रुवारी २०२१ रोजी रिव्हरडेल स्कूलजवळ घडली होती. या प्रकरणात सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत ७ मार्च रोजी दोघा आरोपींना बेड्याही ठोकल्या होत्या. दरम्यान आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेले ६० हजार रुपयांचे मंगळसुत्र सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या हस्ते फिर्यादी महिला कार्तिकी संभाजी गरड (ढोले) यांना बुधवारी (ता.१४) न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आले. या प्रकरणी कार्तिकी संभाजी गरड (२१, रा. बालेवाडी जि. पुणे मुळ रा. शेवगाव जि. नगर) हा २९ जानेवारी रोजी नक्षत्रवाडी, विजयनगर येथे आईला भेटण्यासाठी आल्या होत्या.woman get her necklace after five months in aurangabad glp88

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

७ फेब्रुवारी रोजी कार्तिकी त्याची मुलगी, आई आणि भाऊ असे दुचाकीवर (एमएच २० एफक्यू ७००३) सातारा गावातील खंडोबा मंदीरात देव दर्शनासाठी जात होते. दरम्यान रिव्हरडेल स्कूलजवळ अचानक पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरील दोघांनी कार्तिकी यांच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे सोन्याचे (१४ ग्रॅम ६०० मिली) गंठण हिसकावून घेत तेथून धूम ठोकली होती.

loading image