esakal | महिलेचा गळा आवळून खून, औरंगाबाद तालुक्यातील खळबळजनक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

0Crimenews_13

महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता.१८) सकाळी टाकळी वैद्य (ता.औरंगाबाद) शिवारात उघडकीस आली.

महिलेचा गळा आवळून खून, औरंगाबाद तालुक्यातील खळबळजनक घटना

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता.१८) सकाळी टाकळी वैद्य (ता.औरंगाबाद) शिवारात उघडकीस आली. जिजाबाई मोहन म्हस्के (वय ५५, रा. टाकळी वैद्य) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या खूनामागचे कारण आणि आरोपी अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चिकलठाणा पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, टाकळी वैद्य शिवारात सकाळी साडेआठच्या सुमारास गुराख्यांना एक महिलेचा मृतदेह नजरी पडला होता.

ही माहिती चिकलठाणा पोलिसांना पोलीस पाटलांनी दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील आणि त्यांच्या चमूने तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असता वैद्यकीय सूत्रांनी देखील हा खूनाचा प्रकार असल्याची पुष्टी केली.

त्यानंतर औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकासह श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळ परिसराची अत्यंत बारकाई पाहणी केली. या वेळी फॉरेन्सिक पथकाला देखील पाचरण करण्यात आले होते. पोलिसांसोबत आलेल्या श्वानाने घटनास्थळापासून ते महिलेच्या घरापर्यंत माग काढला होता. रात्री उशिरापर्यंत ठोस काही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. महिलेच्या खूनामुळे पंचक्रोशित मोठी खळबळ उडालेली आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image