
सिल्लोड : शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आलेल्या तक्रारदार महिलेसह नातेवाइकांनी कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदार महिला कर्मचाऱ्यास गळा दाबून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहाला घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.