
छत्रपती संभाजीनगर/वैजापूर : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील सद्गुरू नारायणगिरी आश्रम परिसरातील महिला कीर्तनकार संगीता पवार महाराज यांची हत्या २७ जून रोजी झाली होती. या प्रकरणात मध्यप्रदेशातील दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. चोरी करताना पाहिल्याने पकडले जाऊ या भीतीने संशयितांनी कीर्तनकार पवार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केल्याची कबुली ताब्यातील आरोपींनी दिली.