imtiaz jaleel
imtiaz jaleelimtiaz jaleel

शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरवात

खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्डचे अध्यक्ष सुनित शर्मा यांना रेल्वे रुळाच्या पलीकडील दोन लाखाहून जास्त नागरीकांना वाहतुक व दळणवळणासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन काम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी केली
Published on
Summary

खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्डचे अध्यक्ष सुनित शर्मा यांना रेल्वे रुळाच्या पलीकडील दोन लाखाहून जास्त नागरीकांना वाहतुक व दळणवळणासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन काम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी केली

औरंगाबाद: शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या अनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी (ता. चार) रेल्वे भवन नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांची भेट घेतली. राज्य शासनासोबत भागीदारी तत्वावर मान्यता मिळालेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गच्या कामास प्रशासकीय मंजुरी देऊन काम त्वरीत सुरु करण्याचे आदेश संबंधितांना देण्याची मागणी त्यांनी केली.

जिल्ह्यातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा, पिटलाईन, विद्युतीकरण, मॉडर्न रेल्वेस्टेशन यासह मराठवाड्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी व रेल्वेविभागाची विकासात्मक प्रलंबित असलेल्या मागण्या, प्रकल्प, प्रस्ताव व कामाबाबत सविस्तर चर्चा खासदार जलील यांनी केली. खासदार इम्तियाज जलील यांनी शिवाजीनगर येथे भुयारी मार्ग व्हावा यासंबंधी केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर भुयारी मार्गच्या ३८.६० कोटी रुपयाच्या प्रस्तावास राज्य शासनाबरोबर भागीदारी तत्वावर मान्यता दिली होती.

imtiaz jaleel
बीड जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याचे खंडपीठाचे आदेश

रेल्वेने भागीदारी तत्वावर १६.५५ कोटी निधीची मंजुरी देऊन राज्य शासनाला २२.०५ कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करुन देण्याची विनंती केली होती. त्याअनुषंगाने खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्य शासनाच्या भागीदारी तत्वावरील हिश्याचे २२.०५ कोटी रुपयाच्या निधीची मंजुरी करुन घेतली होती.

imtiaz jaleel
ITI admission 2021: चलो आयटीआय! प्रवेश नोंदणी सुसाट

खासदार इम्तियाज जलील यांनी रेल्वे बोर्डचे अध्यक्ष सुनित शर्मा यांना रेल्वे रुळाच्या पलीकडील दोन लाखाहून जास्त नागरीकांना वाहतुक व दळणवळणासाठी येणाऱ्या अडचणींची माहिती देऊन काम सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. सुनित शर्मा यांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com