Aurangabad Crime | कामगाराचा खून की आत्महत्या? वाळूज परिसरात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime News

Aurangabad Crime | कामगाराचा खून की आत्महत्या? वाळूज परिसरात खळबळ

वाळूज (जि.औरंगाबाद ) : रांजणगाव (शेणपुंजी) येथील मंगलमूर्ती कॉलनीत राहत्या घरात एका ३४ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा संशयास्पद व अर्धनग्न अवस्थेत मृतदेह गुरुवारी (ता.१२) दुपारी आढळून आला. अंगावरील जखमा, घटनास्थळी पडलेले रक्त व उघडा असलेला दरवाजा यावरून हा खून असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे वाळूज (Waluj) परिसरात मोठी खळबळ उडाली असून त्याचा खून करण्यात आला की, त्याने आत्महत्या केली. या संभ्रमात वाळूज एमआयडीसी पोलिस सापडले आहे. (Worker Found Dead In Waluj Area Of Aurangabad)

हेही वाचा: हिंदू, मुस्लिम, शीख आणि जैन समाजानं बनलाय भारत - अकबरुद्दीन ओवैसी

वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मंगलमूर्ती कॉलनीमधील नाजीम रज्जाक सय्यद यांच्या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील एका खोलीत टुनटुनकुमार रमाकांत ठाकूर ( रा. बाभंगगामा, ता.बिहपूर जि. बागलपूर, बिहार) हा परप्रांतीय कामगार लॉकडाऊनपासून एकटाच राहत होता. त्याच्या शेजारी राहणारे दानिश शेख व माजीद अजहर हे धुळे येथून गुरूवारी दुपारी घरी आले असता टुनटुनकुमार याचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना टुनटुनकुमार हा बेशुध्द अवस्थेत दिसला. त्याच्या आंगावर अनेक प्रकाराचे लहान मोठ्या जखमा दिसल्या. तसेच घटनास्थळी रक्तही पडलेले होते. शिवाय त्याच्या तोंडाला फेस आला होता. (Aurangabad)

हेही वाचा: तुम्ही काय आम्हाला बेघर करणार! मनसेचा अकबरुद्दीन ओवैसींना सवाल

ही माहिती त्यांनी घर मालकाला दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक श्यामकांत पाटील यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत, गौतम वावळे, राजेंद्र बांगर, पोलीस अंमलदार अविनाश ढगे, दशरथ खोसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गुन्हे शाखेचे रावसाहेब जोंधळे, राजू साळुंके, रमाकांत पठारे तसेच स्वान पथक व ठस्से तज्ज्ञ यांनीही घटनास्थळीची पाहणी करून माग शोधण्याचा प्रत्यन केला. मृताच्या अंगावरील जखमा, घटनास्थळी पडलेले रक्त व उघडा असलेला दरवाजा. यावरून संशय निर्माण होऊन हा प्रत्यक्षदर्शी खून असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा नेमका खून की आत्महत्या याबाबत पोलीस संभ्रमात सापडले आहेत. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हा खून आहे की, आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे़.

Web Title: Worker Found Dead In Waluj Area Of Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top