
"आमचं घर शिवरायांनी उभं केलंय"; मनसेचं अकबरुद्दीन ओवैसींना प्रत्युत्तर
मुंबई : माझे दोन खासदार आहेत. घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलणार?, असा सवाल एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली. आज गुरुवारी (ता.१२) औरंगाबाद (Aurangabad) येथे पक्षाची सभा पार पडली. त्यावेळी ओवैसी बोलत होते. तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही. कायदा हातात घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्या टीकेला मनसेने (MNS) प्रत्युत्तर दिले आहे. (MNS Leader Yogesh Khaire Criticize Akbaruddin Owaisi Over Speech)
हेही वाचा: मित्रांसोबत खेळणाऱ्या चिमुकल्याला सापाने घेतला चावा, दवाखान्यात नेताना...
पक्षाचे प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की औरंगजेब स्वतःचं घर सोडून महाराष्ट्रात आला. त्याच्या कबरीसमोर झुकत आहात ! तुमचा इतिहासच बेघर होण्याचा आहे. आमचं घर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ केलयं!! अकबरुद्दीन ओवैसी तुम्ही काय आम्हाला बेघर करणार! सडेतोड उत्तर मिळेल, असा इशारा खैरे यांनी ओवैसी यांना दिला आहे.
हेही वाचा: 'राज ठाकरे म्हणजे एक अव्वल कलाकार' केदार शिंदे यांची खास पोस्ट
औरंगाबाद येथील सभेत ओवैसी यांनी आगामी काळात आमखास मैदानावर जाहीर सभा घेणार आहे. त्यावेळी उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांनी मुस्लिम समाजाची सद्यःस्थिती विषयी माहिती दिली. देश हा एकाने बनत नाही. हिंदु, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि शीख समाजाने बनतो, असे अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.
Web Title: Mns Leader Yogesh Khaire Criticize Akbaruddin Owaisi Over Speech
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..