छत्रपती संभाजीनगर - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने मागील सव्वीस वर्षांपासून राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना हे पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येते.