जिंतूर : येलदरी (ता. जिंतूर) येथील पूर्णा प्रकल्पाचे (येलदरी) मंगळवारी (ता.२) दुपारी आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले. आता वीजनिर्मितीसह १५६६० क्युसेकने नदीपात्रात पाम्याचा विसर्ग करण्यात आला. .पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून सुरु असलेल्या विसर्गामुळे येलदरी धरणात आवक वाढली. त्यामुळे गेल्या रविवार व सोमवारी प्रत्येकी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून आणि विद्युत केंद्राद्वारे एकूण ११,१४० क्युसेक विसर्ग केला जात होता..खडकपूर्णा धरणातील विसर्ग सतत वाढत असल्याने आज ‘येलदरी’तूनही विसर्ग वाढविण्यात आला. नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.