आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेऊन मारली तलावात उडी

IT engineer suicide due to wifes torture
IT engineer suicide due to wifes torture

औरंगाबाद : तरुणाने इन्स्टाग्राम खात्यावर ‘आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, पर उन हजारों में हम नही’ असे स्टेटस ठेवून एका मित्राला फोनवर ‘हे आपले शेवटचे बोलणे, मी हर्सूल तलावाच्या काठावर आहे, याच तलावात उडी घेतोय’ असे सांगून हर्सूल तलावात ३१ डिसेंबरच्या सकाळी उडी घेतली होती. (aurangabad suicide news) त्या तरुणाचा अग्नीशामक दलाला पाच दिवसाच्या शोधकार्यानंतर ४ जानेवारीरोजी सकाळी मृतदेह सापडला. कुणाल काकासाहेब देहाडे (१९ रा. सराफा गल्ली, सिटी चौक) असे मृताचे नाव आहे. (Aurangabad Crime)

३१ डिसेंबर रोजी सदर घटनेनंतर मृत कुणालची हर्सूल तलावाच्या (Harsul Lake) काठावर दुचाकी व चप्पल सापडली होती तेव्हापासून अग्नीशामक दलाच्या जवानांनी शोधमोहिम राबवली होती. कुणाल बारावीपर्यंत शिकलेला होता. कुणालचे वडील कंत्राटदार असल्याने गेल्या काही दिवसांपासून तो वडिलांना कामात मदत करत होता. तर त्याला दोन मोठे भाऊ आहेत.

रेल्वेरुळावर गेला अन् उडी घेतली तलावात

३१ डिसेंबररोजी कुणालने वडीलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी दुचाकीवर सोडले. त्यानंतर तो तिथून दुचाकी घेऊन निघाला. दरम्यान मित्र मैत्रिणीसोबत फोन वरून कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे झाले. त्यानंतर कुणालने मित्राला ‘मला धोका मिळाला’ असे म्हणत ‘मी मुकुंदवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या करत आहे’ असे सांगितले. (Aurangabad Police)

दरम्यान मित्रांनी तात्काळ त्याचे घर गाठून माहिती घेतली असता, कुणाल घरी नव्हता. त्यांनी मुकुंदवाडी रेल्वे रुळाकडे धाव घेतली, त्याचवेळी कुणालने मित्राला फोन करुन ‘मी मुकुंदवाडी येथे नसून हर्सूल तलावावर आलो असून तलावात उडी घेत असून माझा हा शेवटचा कॉल आहे’ असे म्हणाला. मग मित्र परिवार, नातेवाईकांनी तात्काळ हर्सूल तलावाकडे धाव घेतली. यावेळी कुणालची दुचाकी आढळून आली. तर पाण्यात त्याची चप्पल आढळली होती.

दरम्यान, हर्सूल तलावावरील सुरक्षारक्षक राजेश गवळे यांनी घटनेची माहिती पोलिसांसह अग्निशामक दलाला दिली. त्यादिवशी चार तास शोधमोहिम राबवली मात्र पाच दिवसांच्या शोधकार्यानंतर अखेर कुणालचा मृतदेह आढळून आला. आत्महत्या करण्यापूर्वी कुणालने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते.

कुणालने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अंमलदार मनगटे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com