esakal | तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पैठणच्या दावरवाडीमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

भारत मोरे यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहीते व सहकारी करित आहेत.

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, पैठणच्या दावरवाडीमधील घटना

sakal_logo
By
दिगंबर सोनवणे

दावरवाडी (जि.औरंगाबाद) : दावरवाडी (ता.पैठण) (Paithan) येथील तरुण शेतकऱ्याने खळवाडीतील खळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.११) दुपारी घडली आहे. भारत भगवान मोरे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे (Farmer Suicide) नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, दावरवाडी येथील (Aurangabad) भारत मोरे याने खळवाडी भागातील स्वत:च्या खळ्यात ट्रॅक्टरच्या ट्रॅलीच्या समोरच्या साईडने दोरखंडाने शुक्रवारी दुपारी अडीच वाजे दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती मिळाल्यावर आरडाओरड करत गावकऱ्यांना बोलावले व पोलिस पाटील दिनकर एडके व गावकऱ्यांनी फासावरुन त्यास खाली उतरवून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. (Young Farmer Committed Suicide In Paithan Block)

हेही वाचा: ग्रामीण भागात आताही कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत गैरसमजच

या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना मिळताच जमादार सुधाकर मोहीते व सहकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली व घटनेची माहिती घेतली. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात (Pachod Police Station) करण्यात आली आहे. भारत मोरे यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुधाकर मोहीते व सहकारी करित आहेत.