Aurangabad : पैठणमध्ये तरुण शेतकऱ्याची नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या

शेतीला जोडधंदा म्हणुन काही शेळ्याही पाळल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शेळ्या दगावल्या.
Farmer Suicide News
Farmer Suicide Newsesakal

विहामांडवा (जि.औरंगाबाद) : अतिवृष्टी , सततची नापिकी यामुळे भासणारी आर्थिक चणचण परिणामी आलेल्या नैराश्यातुन विहामांडवा (ता.पैठण) (Paithan) येथील एका शेतकऱ्याने स्वत:च्या घरात छताच्या आढ्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेउन जीवन संपविले. बळिराम कचरु रोडगे (वय 32) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विहामांडवा पोलिस चौकीचे सहायक पोलिक उपनिरीक्षक सुशांत सुतळे, सुधाकर मोहिते यांनी सदरील घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन उत्तरीय तपासणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यादव सोनकांबळे यांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षत गणेश सुरवशे यांच्या मार्गदर्शनाखाली विहामांडवा पोलिस चौकीचे सहायक पोलिस उपनिरीक्षक करित आहेत.(Young Farmer Committed Suicide In Paithan Taluka Of Aurangabad)

Farmer Suicide News
तानाजी सावंत-राहुल मोटेंना जनतेने नाकारले, वाशी नगरपंचायतीत भाजपला बहुमत

बळीराम हा आपल्या पत्नी व एक मुलीसह राहत होता. वडिलोपार्जित दीड एकर जमीन वहिती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. शेतीला जोडधंदा म्हणुन काही शेळ्याही पाळल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शेळ्या दगावल्या. यंदा अतिवृष्टीमुळे शेतातील पिकही हाती आले नाही. शेतात झालेला खर्च ही पदरात पडला नाही. परिणामी आर्थिक चणचण भासू लागली. प्रयत्न करुनही जीवन जगणे (Farmers Suicide) संघर्षमय झाले. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालावा या विवंचनेत सापडलेल्या बळीरामला नैराश्य आले. त्यातच त्याने आज बुधवारी पहाटे राहत्या घरी छताच्या आढ्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. सदर घटना सकाळी सात वाजता उघडकीस आली. सदर घटनेची नोंद आकस्मिक मृत्यु अशी करण्यात आली आहे. (Aurangabad Updates)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com