esakal | तरुण शेतकऱ्यावर काळाची झडप,पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह |Aurangabad Accident
sakal

बोलून बातमी शोधा

Jagdish Tejanikar
तरुण शेतकऱ्यावर काळाची झडप,पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

तरुण शेतकऱ्यावर काळाची झडप,पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : ब्रह्मगव्हाणहुन बिडकीन येथील खासगी दुध डेअरीला दुध घेऊन जाणारे तरुण शेतकऱ्याच्या दुचाकीला शेकटा-बिडकीन राज्य महामार्गावर भरधाव वाहणाने समोरून ठोकरल्याने एकाचा मुत्यू, तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जगदीश बाबासाहेब तेजिनकर असे मृत तरूणाचे नाव आहे.या बाबत मिळालेली माहिती, अशी की ब्रह्मगव्हाण (ता.पैठण) येथील काही शेतकरी (Farmers) शेतीला जोडधंदा म्हणून दुध उत्पादन करतात व नियमित सकाळ, संध्याकाळ दुचाकीवरून बिडकीन येथील खासगी डेअरीला दुध देतात. शुक्रवार सायंकाळी (Paithan) रिमझिम पावसात दुधाच्या कॅन घेऊन जगदीश बाबासाहेब तेजिनकर (वय २५) व राहुल हरिभाऊ तेजिनकर हे दोन तरुण दुचाकीवरुन (एमएच २० इए ३९३३) शेकटा महामार्गने बिडकीनकडे जात (Accident In Aurangabad) असताना साडेसात वाजता राम हाॅटेल परिसरात वाहनाने धडक देऊन वाहन पसार झाले.

हेही वाचा: तुळजाभवानी मातेची रथालंकार महापूजा, पाहा क्षणचित्रे

दरम्यान काही वेळाने पाठीमागून गितेश तेजिनकर, राम तेजिनकर दुध घेवून आले असता जगदीश व राहुल जखमी अवस्थेत पडलेले दिसले. लगेच स्थानिकांच्या मदतीने गंभीर मार लागलेल्या अवस्थेत दोघांना ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी एकास शासकीय रुग्णालयात घाटीत दाखल केले. असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जगदीश यास तपासून मृत घोषित केले. शनिवारी (ता.नऊ) घाटीच्या खबरीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विष्णू चव्हाण यांनी नोंद केला आहे.

परिरात हळहळ

सदर मृत तरुणाचा पाच महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. शनिवार दुपारी ब्रह्मगव्हाण येथे अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. होतकरू तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने लोहगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top