Chh. Sambhajinager: कर्जबाजारीपणाचा बोजा सहन न झाल्याने तरुण शेतकऱ्याने घेतले टोकाचे पाऊल; कन्नड येथील घटना
Agriculture Crisis: कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली दबलेल्या बेलखेडा येथील तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपवले. कर्ज आणि आर्थिक अडचणींनी शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा काळा सावट पसरले आहे.
नागद (ता.कन्नड) : कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेल्या बेलखेडा येथील एका तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. ८) सकाळी घडली.