लेकीने दिवसभर घेतला बापाचा शोध, पहाटे मिळाली मृत्यूची बातमी

कारभारी मोहिते
कारभारी मोहिते
Updated on

वाळूज महानगर (जि.औरंगाबाद) : भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ५० वर्षीय व्यक्तीस जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात बुधवारी (ता.चार) पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास पंढरपूर (Pandharpur) येथील तिरंगा चौकात झाला. बजाजनगर (Aurangabad) येथील इन्द्रप्रस्थ कॉलनीत आईवडिलांसह (Accident In Aurangabad) राहणाऱ्या रूपाली कारभारी मोहिते (वय २२) ही महिला खासगी नोकरी करते. तिचे वडील कारभारी माधवराव मोहिते (वय ५०) हे वाळूज औद्योगिक वसाहतीतील डीपी ऑटो कंपनीत सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत रात्रपाळीत काम करीत असत. सोमवारी (ता.दोन) कारभारी मोहिते हे कामाला गेले. त्यानंतर ते घरी न आल्याने रुपाली मोहिते यांनी कंपनीत फोन करून विचारणा केली असता कारभारी मोहिते हे मंगळवारी ( ता.तीन) सकाळी सात वाजेच्या सुमारास काम संपल्यानंतर कंपनीतून गेले.

कारभारी मोहिते
जनते पुढे राजकारणी हारले! आंचल गोयल या जिल्हाधिकारीपदी रुजू

त्यामुळे त्यांची चौकशी केली. मात्र ते दिवसभर मिळून आले नाही. बुधवारी (ता.चार) पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास रुपाली यांना पोलिसांनी फोन करून सांगितले की कारभारी माधवराव मोहिते यांचा अपघात झाला असून त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर रूपाली मोहिते व त्यांची आई घाटीत गेले असता कारभारी मोहिते यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी रूपाली यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Waluj MIDC Police) अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.