तीन बहिणींच्या लाडक्या भावाला काळाने हिरावले,राखी बांधणे राहिले

शुभम शेवाळे
शुभम शेवाळे
Updated on

वैजापूर (जि.औरंगाबाद) : तीन बहिणीत एकुलता एक असलेला लहान भाऊ राखी बांधण्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीला माहेरी आणण्यासाठी जात असताना रस्त्यातच नियतीने क्रूर खेळ खेळला. या तिघींचा लाडका भाऊराया अपघातात काळाने हिरावून नेल्याची घटना वरखेड (ता.गंगापूर) फाट्यावर सोमवारी (ता.२३) सकाळी ११.३० वाजता घडली. रक्षाबंधनाच्या (Rakshabandan) दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेने तालुक्यातील (Vaijapur) भींगी-खंडाळा येथे शोककळा पसरली आहे. शुभम अशोक शेवाळे (वय २०, रा. भिंगी बोरसर ता.वैजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आई-वडिलांना एकुलता एक असलेला शुभम (Accident In Aurangabad) रक्षाबंधनाला बहिणी घरी येणार असल्याने उत्साहात होता. सोमवारी तो मोठ्या बहिणीला माहेरी आणण्यासाठी गंगापूरला (Gangapur) आपल्या दुचाकीने जात होता. त्यावेळी शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रांजणगाव पाटीजवळ समोरून येणारी कारने (एम.एच-२० डी.ए०-९०९) समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली.

वैजापूर (जि.औरंगाबाद) : दुचाकीला धडक देणारी कार.
वैजापूर (जि.औरंगाबाद) : दुचाकीला धडक देणारी कार.
शुभम शेवाळे
औरंगाबादेत लवकरच धावणार इलेक्ट्रिक बसेस

यात खाली कोसळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.विशेष म्हणजे सोमवारी लाडक्या शुभमला राखी बांधण्यासाठी त्याच्या बहिण अश्विनी आढवे (रा.येसगाव), आम्रपाली शिंदे (रा. खंडाळा) आणि वनिता लगड (रा.गंगापूर) या तीन बहिणी सोमवारी एकत्र येऊन राखी बांधणार होत्या. परंतु आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्याऐवजी त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची वेळ या भगिनींवर आली. सोमवारी सायंकाळी भींगी शिवारात भावाचे कलेवर पाहून या तीन बहिणींनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

शुभम शेवाळे
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सध्या धोका नाही: राजेश टोपे

दुचाकीचा झाला चुराडा

राखी बांधण्यासाठी लहान भाऊ येत असल्याने गंगापूर येथील मोठी बहीण आनंदीत होती. मात्र, रस्त्यातच नियतीने या भावाला आपल्या बहिणींपासून हिरावून नेले. हा अपघात एवढा भयानक होता की त्यामध्ये शुभमचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याच्या दुचाकीचा चुराडा झाला. विशेष म्हणजे रांजणगाव पाटीपासून गंगापूर केवळ १३ किमी अंतरावरच होते. बहिणीचे घर काही अंतरावर असतानाच त्यांचा आयुष्याचा प्रवास संपला. दरम्यान, शुभम हा शिऊर येथील संत बहिणाबाई महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान, माहिती मिळताच सिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रीया सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Manoj Jarange health update
Devendra Fadnavis on Shiv Sena and NCP Party Ownership
Chhatrapati Sambhajinagar Traffic Issue
woman farmer success story
Marathi News Esakal
www.esakal.com