भयानक! प्रियकारानं पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

भयानक! प्रियकारानं पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद: दिल्लीतील श्रद्धा हत्या प्रकरण सध्या देशभर गाजत आहे, यादरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याचा प्रकर समोर आला आहे. या घटनेत हे दोघेही गंभीररित्या भाजले आहेत. हे दोघेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवडा विद्यापिठातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु असून या तरुणाने स्वतःला पेटवून का घेतलं याचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी ही आगीवर नियंत्रण मिळवले. हे एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला की दोघे एकमेकांना ओळखत होते याबद्दल नेमकी माहिती मिळालेली नाही. या प्रकरामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ माजली होती.

टॅग्स :Aurangabad News