esakal | तरुणाची आत्महत्या, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
sakal

बोलून बातमी शोधा

कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या

तरुणाची आत्महत्या, अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जेहूर (जि.औरंगाबाद) : तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या एका तरूणाने आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.१३) घडली. त्याने आत्महत्या केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नानासाहेब रायभान जाधव (वय २७, रा. जेहूर ता.कन्नड) Kannad असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी Aurangabad सकाळी सदर तरुणाने शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.youth committed suicide in kannad tahsil of aurangabad gpl88

हेही वाचा: नांदेडमध्ये गुन्हे शाखेने आठ लाखांचे ५१ मोबाईल काढले शोधून

याबाबत माहिती मिळताच देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली औराळा पोलिस चौकीचे हेड कॉन्स्टेबल एस. पी. आव्हाळे, बीट जमादार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. प्रदीप कांबळे, परिचर शेख अली शेख मेहमूद यांनी शवविच्छेदन केले. यानंतर पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, सदर तरुणाने आत्महत्या का केली. याचे कारण समजू शकले नाही. त्याचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मृत तरुणावर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

loading image