नांदेडमध्ये गुन्हे शाखेने आठ लाखांचे ५१ मोबाईल काढले शोधून

नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ लाख रुपयांचे ५१ मोबाईल शोधून काढले आहेत. पथकासमवेत पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदी.

नांदेड : जिल्ह्यात Nanded सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून गहाळ झालेले आठ लाख एक हजार नऊशे रुपयाचे मोबाईल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोधले आहेत. नांदेड शहर व जिल्ह्यात सार्वजनिक व आठवडे बाजारात महागडे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलिस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या Local Crime Branch पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सूचना दिल्या. त्यानंतर चिखलीकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला. वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अठरा, शिवाजीनगर हद्दीतील आठ, भाग्यनगर हद्दीतील नऊ, विमानतळ हद्दीतील पाच, इतवारा हद्दीतील तीन, नांदेड ग्रामिण हद्दीतील सहा तसेच कंधार आणि देगलूर हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण ५१ मोबाईलचा शोध लाऊन ताब्यात घेतले आहेत.local crime branch seized 8 lakh rupees mobiles in nanded gpl88

नांदेड : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ लाख रुपयांचे ५१ मोबाईल शोधून काढले आहेत. पथकासमवेत पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदी.
औरंगाबादेत कोरोना लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा पूर्ण

त्याची किंमत अंदाजे आठ लाख एक हजार नऊशे रुपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी दिली. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मुंडे, पोलीस हवालदार चांद शेख, गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संजय केंद्रे, दशरथ जांभळीकर, पोलिस नाईक विश्वनाथ इंगळे, बालाजी तेलंग, पोलिस शिपाई विठ्ठल शेळके, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, पोलिस नायक राजू सिटीकर, श्री ओढणे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com