esakal | सिल्लोडमध्ये विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

सय्यद सलीम तायेब

वादळी वाऱ्यामुळे घराची पत्रे उचकटली होती. यामुळे सदर तरुण घरावरील पत्रे ठिक करण्यासाठी गेला होता.

सिल्लोडमध्ये विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : घराच्या पत्रांची दुरुस्ती करण्यासाठी घरावर गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का (Electricity Shock) बसून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सय्यद सलीम तालेब (वय ३२, जोहर कॉलनी) (Sillod) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवार रोजी वादळी वाऱ्यामुळे घराची पत्रे उचकटली होती. यामुळे सदर तरुण घरावरील पत्रे ठिक करण्यासाठी गेला होता. (Youth Died Due To Electricity Shock In Sillod)

हेही वाचा: 'माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई-बाबा बाय'

तेव्हा ११ केव्ही विद्युत वाहिनीचा धक्का बसताच सय्यद सलीम खाली पडला. त्यास उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात (Sillod City Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.