esakal | 'माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई-बाबा बाय'
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील गोरेगावात विद्यार्थ्याची आत्महत्या

लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून तो औरंगाबादला आला होता. त्याला मानसिक आजार होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

'माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई-बाबा बाय'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार आहे, आई बाबा बाय अशी सुसाईड नोट लिहून वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.२५) सकाळी सातारा परिसरात घडली. सागर महेंद्र कुलकर्णी (वय २१, रा. ज्योती प्राईड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सागर हा लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या तृतीय वर्षात शिकत होता. लाॅकडाऊन (Lock Down)सुरु झाल्यापासून तो औरंगाबादला (Aurangabad) आला होता. (Medical Student Committed Suicide In Aurangabad)

हेही वाचा: 'पीएम केअर्स'च्या १७ व्हेंटिलेटर्समध्ये त्रुटी

त्याला मानसिक आजार होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वडील सकाळी ड्युटीवर गेले आणि आई घरकाम करत होती. साधारण साडेअकराच्या सुमारास सागरने घरातील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. शेजाऱ्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. दरवाजा तोडून सागराला घाटीत दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.