
Aurangabad News | पैठणमध्ये पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
लोहगाव (जि.औरंगाबाद) : जायकवाडी जलसाठ्यात बुडीत झालेले जुने मावसगव्हान परिसरात मासेमारी करणाऱ्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.तीन) दुपारी घडली. आबासाहेब गोविंद बर्डे (वय ३५, रा. नवे मावसगव्हान, ता.पैठण) असे मृताचे नाव आहे. सुर्यास्तापर्यंत अग्निशामक दल व स्थानिक तरूणांच्या पथकाला मृताचा शोध लागला नाही. या बाबत मिळालेली माहिती अशी की पुनर्वसित मावसगव्हान येथील आबासाहेब बर्डे हा सकाळी जायकवाडी जलाशयाच्या पाण्यात बुडीत झालेल्या जुने मावसगव्हान परिसरातील अथांग जलसाठ्यात मासेमारी करताना दुपारी बारा वाजेदरम्यान पाण्यात पडल्याची माहिती पोलीस पाटील मानिक साळवे यांना मिळाली.(Youth Drowned In Back Water Of Jayakwadi In Paithan Of Aurangabad)
हेही वाचा: इंडियन ऑईलचा कार्यक्रम; चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोरच सुरू झाली पाॅर्न फिल्म
त्यांनी ही माहिती बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांना दिली. माने यांच्या आदेशाने हवालदार सोमनाथ तांगडे, कर्मचारी समोल वसावे, सचिन म्हस्के यांनी घटनास्थळी दाखल होऊन स्थानिक पोहणारे पंधरा तरूण व अग्निशामक शीघ्रकृती दलाची टीमच्या मदतीने सायंकाळी सुर्यास्तापर्यंत जलाशयात शोध मोहीम राबवली. (Aurangabad)
हेही वाचा: बेरोजगारी,महागाई असताना भाजपला राहुल गांधींची आठवण होते - रोहित पवार
परंतु मृताचा तपास लागला नाही. अखेर अंधार पडल्याने मोहीम थांबवण्यात आली असल्याचे हवालदार तांगडे यांनी सांगितले.
Web Title: Youth Drowned In Back Water Of Jayakwadi In Paithan Of Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..