धक्कादायक ! घरातून बेपत्ता झालेला तरुण सापडला मृतावस्थेत

तरुण एका खासगी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.
Aurangabad Crime News
Aurangabad Crime Newsesakal
Updated on

आडूळ (जि.औरंगाबाद ) : आडूळ तांडा (ता.पैठ़ण) येथील एका २८ वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (ता.तीन) सकाळी उघडकीस आली. वामन रोहिदास राठोड असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. वामन राठोड हा युवक बुधवारपासून (ता.दोन) घरातून बेपत्ता होता. आज गुरुवारी सकाळी आडूळ खुर्द शिवारात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका मंदिराजवळ जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना वामन मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची एक बाटली पाचोड पोलिसांना मिळून आली. वामन हा औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. (Youth End Himself In Paithan Taluka Of Aurangabad)

Aurangabad Crime News
Jalna Crime | जालन्यात दोन गटात तुफान हाणामारीत गोळीबार, एक जण गंभीर जखमी

मागील बऱ्याच दिवसांपासून तो आपल्या मूळगावाकडे आला होता. त्यानंतर तो पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतलाच नाही. वामन याच्यावर आज गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात तांड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. सदरील घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जगन्नाथ उबाळे हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com