esakal | वेरुळमध्ये तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या | Aurangabad Crime
sakal

बोलून बातमी शोधा

Kundan Pawar | Aurangabad Crime

वेरुळमध्ये तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वेरुळ (जि.औरंगाबाद) : वेरूळ (ता.खुलताबाद) (Khultabad) येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात राहणाऱ्या कुंदन अवलिया पवार (वय ३५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.१३) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात रुद्राक्ष माळा व इतर साहित्य विकून आपली गुजराण (Crime In Aurangabad) करणारा तरुण कुंदन हा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. आज गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवालय तीर्थ कुंडाजवळ असलेल्या डेन्स फॉरेस्टमध्ये एका व्यक्तीने फाशी घेतली याची माहिती पोलीस पाटील रमेश देवरे यांना मिळाली.

हेही वाचा: औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर थरार,धावत्या कंटेनरला अचानक लागली आग

त्यांनी सदरील घटनेची माहिती खुलताबाद पोलीस ठाण्यास दिली. पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, बीट जमादार ए. आर. पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब महादाने, पोलीस कॉन्स्टेबल आर.एस. भिसे, पोलीस कॉन्स्टेबल जी.डी. चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. स्थानिक तरुणांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, वेरुळ येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top