esakal | दारु खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा खून, औरंगाबादच्या सिडकोतील घटना | Aurangabad Crime Updates
sakal

बोलून बातमी शोधा

दारु खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा खून, औरंगाबादच्या सिडकोतील घटना

दारु खरेदीसाठी आलेल्या तरुणाचा खून, औरंगाबादच्या सिडकोतील घटना

sakal_logo
By
अतुल पाटील

औरंगाबाद : वाईन शॉपवर दारु घेण्यासाठी आलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा खून झाला आहे. सिडको एन-आठ येथील विश्वास वाईन शॉपवर रविवारी (ता.दहा) रात्री सव्वा नऊ वाजेदरम्यान ही घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ रंगनाथ हिवराळे (रा. मथुरा नगर, सिडको, एन- सहा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव (Aurangabad) आहे. विश्वास वाईन शॉपच्या काऊंटरवर सिद्धार्थ उभा होता. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या एकाने येऊन त्याच्या पोटात जोराचा चाकू मारला. त्यात गंभीर इजा झाली होती. आरोपी तत्काळ पळून गेला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी (Crime In Aurangabad) दाखल झाले. जखमी अवस्थेत त्या तरुणाला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा: तरुण शेतकऱ्यावर काळाची झडप,पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

घटनास्थळी डीसीपी दीपक गीऱ्हे, निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे, रमेश राठोड, अशोक अवचार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज चेक केले. त्यानंतर आरोपीच्या शोधात गुन्हे शाखा आणि डीबी पथक मागावर आहेत. संशयिताचा शोध घेत आहेत.

पत्नीला भांडण झाल्याचे सांगितले

आरोपीचे नाव विशाल आगळे (वय २२) आहे. शोध सुरु आहे. दुपारी चार वाजता कुणासोबत भांडण झाल्याचे सिद्धार्थने पत्नीला सांगितले होते. तसेच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू धक्क्याने झाला म्हणतायत. कारण चाकू दोनदाच लागला, पोटात चाकू मारलेला. पण कुठे अवयवाला इजा नव्हती. छातीवर चाकूचा ओरखडा आहे.

loading image
go to top