
दौलताबाद/वैजापूर : पैशाच्या मागणीमुळे झालेल्या वादात एक प्रियकराने रागाच्या भरात दगडावर डोके आपटून प्रेयसीचा गुरुवारी (ता.२४) रात्री खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह दौलताबाद येथील घाटात फेकून दिला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शिऊर पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. दीपाली आस्वार-त्रिभुवन (वय १९) असे मृत प्रेयसीचे, तर सुनील सुरेश खंडागळे (वय २१) प्रियकराचे नाव आहे.