Gas Leak: गॅस गळतीनंतर आगीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; जवाहर कॉलनी परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत घटना
Fire Accident: छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर कॉलनी परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत २१ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. सीएची तयारी करणारा हा तरुण घरातच जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
छत्रपती संभाजीनगर : जवाहर कॉलनी परिसरातील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहाला उघडकीस आली. ओम संजय राठोड (२१, रा. बंबाटनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.