esakal | युवकांनी केले बेरोजगारी, महागाईविरोधात विद्यापीठ गेटवर निदर्शने
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - महागाई आणि बेरोजगारी विरोधात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह शहरातील विद्यार्थी आणि युवक संघटनांच्या वतीने विद्यापीठ गेटवर निदर्शने करण्यात आली.

युवकांनी केले बेरोजगारी, महागाईविरोधात विद्यापीठ गेटवर निदर्शने

sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद : महागाई (Inflation) आणि बेरोजगारी (Unemployment) विरोधात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह (Babasaheb Ambedkar Marathwada University) शहरातील (Aurangabad) विद्यार्थी आणि युवक संघटनांच्या वतीने आज सोमवारी (ता.१९) विद्यापीठ गेटवर निदर्शने करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील (Maharashtra) विद्यार्थी आणि युवक आज बेरोजगारीच्या विळख्यात अडकून पडलेले आहेत. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे तरुणांचे आयुष्य बरबाद होत आहेत. आज आम्ही औरंगाबाद शहरातील सर्व विद्यार्थी संघटना आणि युवक संघटना एकत्र येऊन या जीवघेण्या बेरोजगारी आणि महागाई विरोधात हल्लाबोल करत आहेत. (youths agitation against unemployment and inflation at bamu gate in aurangabad glp 88)

हेही वाचा: महिला पोलिस उपनिरीक्षकास इमारतीवरुन दिले फेकून, आरोपीस शिक्षा

प्राध्यापक, शिक्षक भरती तत्काळ सुरू करा, घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यात यावेत, राज्य शासनाच्या सर्व आस्थापनातील जागा भरण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या निदर्शनात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, सम्यक विद्यार्थी आंदोलन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, मास, एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, आॅल इंडिया पँथर सेना, आंबेडकरायट हिस्ट्री काँग्रेस, रिपब्लिकन सेना, एमआयएम विद्यार्थी संघटनेचे पदधिकारी आदी सहभागी झाले होते.

loading image