esakal | महिला पोलिस उपनिरीक्षकास इमारतीवरुन दिले फेकून, आरोपीस शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

high court

महिला पोलिस उपनिरीक्षकास इमारतीवरुन दिले फेकून, आरोपीस शिक्षा

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : महिला पोलिस उपनिरीक्षकास (Police Sub Inspector) जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस नाईक आशिष ढाकणे यास सत्र न्यायालयाच्या (Session Court) न्यायाधीश नीता मखरे यांनी सोमवारी (ता.१९) सात वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, ३१ मे २०१९ रोजी सकाळी सहाच्या सुमारास शहरातील श्री कृष्ण नगरमधील निर्मल अपार्टमेंटमध्ये (Osmanabad) राहणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मनिषा गिरी या इमारतीवरुन पडल्याने जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी प्रथमदर्शनी मनिषा गिरी यांनी अज्ञात कारणावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. त्यानुसार तसाच गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविला होता.(police naik convicted for attempt of killing lady police sub inspector in osmanabad glp88)

हेही वाचा: पैठणनगरीतून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मात्र जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर उपचारादरम्यान मनिषा गिरी यांनी पोलिसांना जबाब दिला. तेव्हा पोलिस मोटार परिवहन विभागामध्ये सेवेत असलेला पोलिस कर्मचारी आशिष ढाकणे याने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकुन दिल्याचे जबाबात सांगितले. आशिष ढाकणे विरोधात ता.२९ जुन रोजी ३०७ नुसार आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड होते, तर शासकीय अभियोक्ता म्हणुन एस.बी.जाधवर यांनी कामकाज पाहिले.

वरिष्ठ अधिकारी बदनाम

ही घटना घडल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. या प्रकरणात विनाकारण एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव आले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळुनच महिला अधिकाऱ्यांनी हे कृत्य केल्याचे भासविले गेले होते. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी देखील करण्यात आली होती. मात्र स्वतः महिला अधिकारी शुद्धीवर आल्याने त्यानी खरा प्रकार सांगितल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला. तेव्हा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने सुटकेचा निःश्वास सोडला.

loading image