औरंगाबाद : जिल्हा परिषदेला प्रशासक लागताच शिक्षणाचा गोंधळ सुरू

सातळ्याच्या विद्यार्थ्यांची तहसील कार्यालयात भरली शाळा
फुलंब्री : येथील तहसील कार्यालयात सातळा पिंपरी येथील विद्यार्थ्यांची भरलेली शाळा.
फुलंब्री : येथील तहसील कार्यालयात सातळा पिंपरी येथील विद्यार्थ्यांची भरलेली शाळा. sakal

फुलंब्री : औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेला प्रशासक लागतात शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू झाला असून शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील साताळ पिंप्री येथील एक विशेष शिक्षक गेल्या तिनं महिन्यापासुन  प्रतिनियुक्तीवर गेला असल्याने विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची वारंवार मागणी करुनही शिक्षक मिळाला नसल्याने शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थांची अखेर बुधवार (ता.23) रोजी तहसील कार्यालयात तिन तास शाळा भरविली. मात्र तहसीलदारांनी ही कोणत्याही प्रकारचे ठोस आश्वासन दिले नसल्याने शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीने दिला आहे.  जिल्हा परिषदेत प्रशासक लागतात शिक्षणाचा गोंधळ सुरू झाला असल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषदेला 20 मार्च रोजी प्रशासक लागले त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेवर कुठलाही लोकप्रतिनिधींचा वचक राहिला नाही. अधिकाऱ्यांचाही वचक नसल्याने मनमानी कारभार सध्या जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुरू असल्याचे दिसून येत आहे. साताळ पिंप्री येथे जिल्हा परिषदेची १ते ८ इयत्ते पर्यंत शाळा असुन एकुण १५८ विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांसाठी एकुण सात शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. परंतु मागिल डिसेंबर २०२१ पासुन यातील विशेष शिक्षक रामेश्र्वर पांचाळ हे मतदान नोंदणी अधिकारी औरंगाबाद कार्यालय येथे प्रतिनियुक्तीवर गेले आहे. विशेष म्हणजे पांचाळ यांच्याकडे गणित आणि हिंदी हे दोन विषयी शिकवणीसाठी आहे.

कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थाच्या शाळा बंदच असल्याने शैक्षणिक नुकसान झाले आणि त्यात आणखी शिक्षकांची प्रतिनियुक्ती इतरत्र झाल्याने शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थानी फुलंब्री तहसीलदार शितल राजपुत यांना निवेदने देऊन सदर शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. परंतु तहसीलदार यांनी गटशिक्षणाधिकारी फुलंब्री यांच्याकडे जाण्याचा मार्ग दाखविला आहे. दरम्यान शालेय समितीचे अध्यक्ष रामदास देवरे व काही शिक्षण प्रेमी यांनी गटशिक्षणाधिकारी पाटील यांची भेट घेतली. मात्र तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांच्याकडुन कुठलेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आता शाळेला कुलुप ठोकणार असल्याचा इशारा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास देवरे, कृष्णा जाधव सदस्य आजिनाथ जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

● तीन तास ठिय्या.... विद्यार्थी भुकेने व्याकूळ ●

विद्यार्थानी तीन तास तहसील कार्यालयात ठिय्या मांडुन शिक्षणाची दुर्दशा करत ज्ञानाचे धडे गिरविले. शेवटी पोटाला भुकेने व्याकुळ झाल्याची विद्यार्थाची ओरड ऐकुण एका शिक्षकानी सर्व विद्यार्थ्यांना तहसीलच्या आवारात चहा बिस्किटे व पाणी पाजले.

● संबधीत शिक्षकाने स्वतःचे हित जोपासले ●

सातळा पिंपरी येथील शिक्षक रामेश्र्वर पांचाळ यांनी आपल्याला सोईस्कर व्हावे म्हणजे ग्रामिण भागात येरझाऱ्या मारण्यापेक्षा शहरातल्या- शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन प्रतिनियुक्ती करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार न करता आपलेच स्वतःचे हित जोपासले असल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास देवरे यांनी केला आहे.

● जिल्हा परिषदेत प्रशासक लागताच गोंधळ ●

औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेत प्रशासक लागतात शिक्षणाचा गोंधळ सुरू झाला असून फुलंब्री तालुक्यातील सातारा पिंपरी येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची चक्क तहसील कार्यालयातील शाळा भरवली. प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी ही शाळा भरली असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे हित जोपासावे अशी मागणी पालक वर्गातून होऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com