
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील अर्धवट कामे, विविध विकास आराखडे, वर्क ऑर्डर, निविदांची कामे; तसेच जिल्ह्यातील मंदिरे, धार्मिकस्थळे, पर्यटनस्थळांची अपूर्ण कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महिनाअखेरपर्यंत सर्व अपूर्ण कामे पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासन कामाला लागले.