esakal | औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी कीर्ती कांबळे I Kirti Kamble
sakal

बोलून बातमी शोधा

Kirti Kamble

औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी कीर्ती कांबळे

sakal_logo
By
जलील पठाण.

औसा - सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यावर भर देणाऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी एकहाती सत्ता हस्तगत केल्यावरही समाजातील सर्व घटकांना उपनगराध्यक्ष व प्रभारी नगराध्यक्ष पदी संधी देण्याचे घोषित केले होते. दिलेल्या शब्दप्रमाणे त्यांनी पाच वर्षात पाच प्रभारी नगराध्यक्ष नियुक्त करून आपली वचनपूर्ती केली आहे. बुधवारी (ता. ६) त्यांनी स्वतः रजेवर जात कीर्ती कांबळे यांना प्रभारी नगराध्यक्षपदी संधी देत पचचा आकडा गाठला. नगराध्यक्ष पदाच्या पंक्तीत आता महिला आणि विशेष म्हणजे दलित महिलेला दुसऱ्यांदा ही संधी मिळाल्याने डॉ. अफसर शेख यांची सोशल इंजिनिअरिंगची ही खेळी आगामी निवडणुकीत चांगलीच फायदेशीर ठरू शकते.

गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डॉ. अफसर शेख यांनी स्वतः जनतेतून नगराध्यक्ष पद जिंकत वीस नगरसेवक असलेल्या या पालिकेवर तब्बल बारा नगरसेवक निवडून आणत विरोधकांना चारिमुंडया चित केले होते. पूर्ण बहुमत प्राप्त करूनही त्यांनी सत्ता केवळ आपल्याच खिशात न ठेवता समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी पाच वर्षांत पाच उपनगराध्यक्ष आणि पाच प्रभारी नगराध्यक्षपदी संधी देऊन सामाजिक समतोल राखण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा: 'अनेकांनी काँग्रेस संपवण्याची भाषा केली,पण कधीच संपली नाही'

याच धर्तीवर त्यांनी प्रथम मराठा समाजाचे भरत सूर्यवंशी, जावेद शेख, कुरेशी समाजाचे अलिशेर कुरेशी, मेहराज शेख तर बुधवारी (ता. ६) कीर्ती कांबळे यांना नगराध्यक्षाच्या खुर्चीत बसविले. त्याच बरोबर स्वीकृत नगरसेवकपदीही वेगवेगळ्या समाजाला संधी दिली. सत्तेतही सामाजिक समतोल राखण्यात डॉ. श्री शेख हे यशस्वी झाल्याने याचा मोठा फायदा येणाऱ्या पालिका निवडणुकीत होणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रभारी नगराध्यक्षपदाची निवड करतेवेळी स्वछता सभापती मेहराज शेख, जावेद शेख, मुजाहेद शेख, पाणी पुरवठा सभापती गोविंद जाधव, मुख्याधिकारी वसुधा फड यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

loading image
go to top