

Authentic Paithani Sarees Will Have Digital Identity With Barcode and Official Logo Under New Government Decision
esakal
पैठण: पैठणी साडीच्या नावाखाली बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट आणि पॉवरलूमवरील साड्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता प्रत्येक अस्सल पैठणीला बारकोड आणि अधिकृत लोगो देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे पैठण येथील पैठणी विणकरांनी स्वागत केले असून, बारकोडच्या माध्यमातून साडीच्या अस्सलतेसोबतच तिच्या निर्मितीचा संपूर्ण मागोवाही उपलब्ध करून देण्याची मागणी विणकरांकडून होत आहे.