Payal Vavhal
sakal
पाचोड - आत्मविश्वास व जिद्दीच्या बळावर लिंबगाव (ता. पैठण) येथील रिक्षा चालक गौतम वाव्हळ यांची मुलगी पायल वाव्हळ हिने पुणे शहर पोलीस दलात यश मिळवून गावांतून महिला पोलिस होण्याचा प्रथम बहुमान मिळविला असून तिच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी गावांत मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत केले.