Deglur Accident : खड्डा चुकवण्याच्या नादात ऑटोने दिली हुलकावणी; मिनीबस पलटी होऊन १७ प्रवासी जखमी

प्रवासी ऑटो ने हुलकावणी दिल्याने समोरून येणाऱ्या शिख यात्रेकरूची मिनी बस रस्त्याच्या कडेला पलटी.
mini bus overturn
mini bus overturnsakal
Updated on

देगलूर - रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात एका प्रवासी ऑटो ने हुलकावणी दिल्याने समोरून येणाऱ्या शिख यात्रेकरूची मिनी बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात ऑटो व मिनी बसमधील १७ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना शहरापासून जवळच असलेल्या कारेगाव गावाजवळ मंगळवारी ता. १ रोजी दुपारी घडली.

यातील गंभीर जखमी हे झरी, शिवनी व पंजाब मधील असून या सर्वांना नांदेडला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. झरी माळेगाव येथील प्रवासी ऑटो हा प्रवासी घेऊन देगलूर येथून गावाकडे जात होता व त्याचवेळी पंजाब मधील शिख यात्रेकरू हे बिदर (कर्नाटक) येथून नांदेडकडे येत असताना ऑटो चालक विठ्ठल वरसवाड हा रस्त्यातील खड्डा चुकविण्याच्या नादात समोरून येणाऱ्या वाहनाला हुलकावणी दिली.

त्यामुळे शिख यात्रेकरूची मिनी बस वेगात असल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. व ऑटो दुसऱ्या बाजूला पलटी झाला यामध्ये झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील १७ प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर यातील गंभीर जखमींना नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अपघातातील गंभीर जखमींची नावे गंगाराम मल्हारी वाघमारे (वय-५५ वर्ष) रा. शिवणी, विठ्ठल भीमराव वरसवाड (वय-३५ वर्ष), रा. झरी, ऑटोचालक जालिंदर मारुती गुडमे (वय-३६ वर्ष) रा. झरी, मारुती माधवराव भुताळे (वय ५०-वर्ष) राहणार झरी, शहाजी धोंडीबा झरिकर (वय ४५-वर्ष) रा. झरी, गंगाधर रामराव तोटावर (वय ४५-वर्षे) रा. पेंडपल्ली, निर्मल सिंग बहादुर सिंग (वय ४२-वर्ष) रा. आसनलखुद जि. बरनाल,पंजाब सुरजीतसिंग पुरोहितसिंग (वय-६५ वर्ष) रा.कलकेगाव जि. बरनाल, पंजाब,सुखदेवसिंग मोतासिंग (वय-६० वर्ष) रा. ठडाणा, पंजाब, जयपालसिंग हरावंशलाल (वय-६० वर्ष) रा. भगा, जि. नवाशहर, पंजाब प्रीतमसिंग अमरसिंग (वय-८९ वर्ष) गाजियाबाद, नंदग्राम, पंजाब , कुलवीरकौर कुलवंतसिंग वय-५५ वर्ष, मेवासिंगवाला, कुपुरथाला, पंजाब, सुंदरजीतकौर अवतारकौर (वय- ५६ वर्ष), गाजियाबाद, नंदग्राम, पंजाब, मोहनसिंग रतनसिंग (वय- ६० वर्ष) रा. यमुना नगर पंजाब, अवतारसिंग प्रीतमसिंग (वय-५७ वर्ष) रा, गाजियाबाद, नंदग्राम, पंजाब, लक्ष्मीबाई संग्राम वाघमारे (वय-५० वर्ष) रा. शिवणी, ता. देगलूर, जि. नांदेड. सुरिंदरकौर सुखदेव सिंग, (वय-६० वर्ष) रा. नवाठाणा, कपूर थाला (पंजाब) याप्रकरणी देगलूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड हे करीत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com