Weather Data: आता गावातच कळणार हवामानाचा अंदाज; निलंगा तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींत उभारणार ‘स्वयंचलित हवामान केंद्रे’
Maharashtra Agriculture: निलंगा तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. या यंत्रांमुळे शेतकऱ्यांना तापमान, पाऊस, आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा याची अचूक माहिती मिळणार आहे.
निलंगा : केंद्र सरकारच्या विंडस् अर्थात हवामान माहिती नेटवर्क डाटा सेंटर प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणाऱ्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.