esakal | परभणी जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस.jpg

परभणी जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : जिल्ह्यात (Rain In Parbhani) पावसाने सरासरी ओलांडली असून एक जुनपासून आजपर्यंतच्या अपेक्षित पर्जन्यमानाशी तुलना केली, तर १३४.१ टक्के पाऊस झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाथरी (Pathari) तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या तालुक्यातील चार ही मंडळात १ जूनपासून १२ सप्टेबरपर्यंत १०६५.४ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात (Parbhani) दोनवेळा अतिवृष्ठीची नोंद झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात याचा फटका बसलेला आहे. शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन व कपाशीचा पेरा आहे. परंतू या दोन्ही वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याची घटना घडलेल्या आहेत.

हेही वाचा: आष्टी-साबलखेड रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलन

त्यामुळे आता पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिलेले आहेत. काही गेल्या दोन - तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निश्चित मदत पडेल अशी आशा व्यक्त होत आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पाथरी तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर चांगला राहिला. जुन महिन्यात या तालुक्यात सरासरीच्या १८५.३ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात सरासरीच्या १७१.९ टक्के, ऑगस्ट महिन्यात १०७.४ टक्के तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातच १२६.५ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. तालुक्यातील पाथरी मंडळात १३०६.७ मिलीमिटर, हादगाव मंडळात १०४२.५ मिलीमिटर, बाभळगाव मंडळात ९६७.७ मिलिमीटर तर कासापूरी मंडळात ९४०.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील नऊ तालुक्यात ६६५.५ मिलीमिटर पाऊस अपेक्षित होता. परंतू जुन पासून १३ सप्टेबर पर्यंत ८८६.० मिलीमिटर पाऊस झालेला आहे. ता. १३ सप्टेंबर रोजी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या त्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झालेली आहे. जिल्ह्यात या २४ तासात ६.७ मिलीमिटर पाऊस झालेला आहे.

तिन दिवस जोरदार पाउस पडणार !

मुंबई, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यासह कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्रात, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागाला ता.१५ सप्टेबरपर्यंत झोडपूण काढणार असल्याचा अंदाज परभणी जिल्ह्यातील हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविलाआहे. तर ता. १६ ते २० दरम्यान सूर्यदर्शन होईल. त्यानंतर ता. २१ सप्टेबरनंतर परत राज्यात पावसाला सुरवात होणार असल्याचा अंदाजही श्री.डख यांनी वर्तविला आहे. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण देखील सप्टेंबरमध्ये भरेल असेही भाकित त्यांनी वर्तविले आहे.

loading image
go to top