
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसाने जलेश्वर नदीवरील टोकाईगड, डोंगरकडा, बाळापुर, दांडेगाव, गिरगाव, पार्डी, कानोसा सोमठाना आदी गावाला जाणारा पर्यायी पुल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे.
हिंगोली : जिल्ह्यात पावसाने सुरवात केली असून मृग नक्षत्रात पडत असलेल्या या पावसाने शेतकऱ्यातून समाधान मानले जात आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ४०.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधीक पावसाची नोंद वसमत तालुक्यातील हयातनगर मंडळात झाली आहे.
जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ शहरासह तालुक्यातील सर्वदुर पाऊस झाला आहे. गुरूवारी (ता.११ जून) पहाटे सर्वत्र सुरू झालेला पाऊस सकाळी आठ वाजेपर्यत सुरू होता. दरम्यान जिल्ह्यात ४०.४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात वसमत तालुक्यातील हयातनगर मंडळात ८२ तर टेंभुर्णी मंडळात ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मंडळ निहाय झालेला पाऊस
एकूण २५७.०० तर सरासरी ३६.७१ मिलीमीटर
एकूण २०४.० तर सरासरी ३४.० मिलीमीटर
एकूण ८९.० तर सरासरी १४.८३ मिलीमीटर
एकूण ४०३.० तर सरासरी ५७.५७ मिलीमीटर
एकूण २३६.०० सरासरी ५९.० मिलीमीटर
हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी -
कळमनुरी तालुक्यातील शेवाळा परिसरात असलेल्या देवजना येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे वाऱ्याने उडाली होती तर रस्त्यावरील झाडे देखील उन्मळून पडली आहेत. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे झालेल्या पावसाने जलेश्वर नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पुल वाहून गेल्याने टोकाईगड, डोंगरकडा, बाळापुर, दांडेगाव, गिरगाव, पार्डी, कानोसा, सोमठाणा आदी गावाला जाणारा पर्यायी पुल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे.
पेरणीची लगबग झाली सुरु
गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवामान खात्याने आजही पावसाची शक्यता वर्तविली आहे. यावर्षी आतापर्यंत हवामान खात्याने दिलेले अंदाज खरे ठरल्याचे शेतकरी सांगत आहेत. या पावसाने शेतकऱ्यातून समाधान मानले जात असून पेरणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र आहे.