वाहन चालवितांना मोबाईलचा अतिवापर टाळावा- फस्के 

फोटो
फोटो

नांदेड : वाहन चालवितांना होणारा मोबाईलचा अतिवापर व आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसून प्रवास करणे हे गंभीर असून असे प्रकार टाळण्यासाठी जनतेने स्वत: हून प्रयत्न करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) अभिजित फस्के यांनी केले.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन कार्यक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात सोमवारी (ता. १३) जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री फस्के बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फास्के, प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेष कामत, महानगरपालिकेचे उपायुक्त सुधीर इंगोले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल जाधव उपस्थित होते.

अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत करावी
पुढे बोलतांना श्री फास्के यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत करण्याचे आवाहन करुन त्यांना तात्काळ मदत मिळाल्यास जिवितहानी टाळता येईल. अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणा-या व्यक्तीची कोणतीही चौकशी किंवा प्रश्नाची उत्तरे द्यावी लागणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेष कामत यांनी सप्ताहामध्ये होणा-या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी मागिल काही वर्षातील भारत, महाराष्ट्रासह व नांदेड जिल्ह्यातील अपघाताची माहिती दिली. एका अपघातातून त्यांचे कुटंब उध्दवस्त होते. त्यामुळे होणा-या परिणामाची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीबाबत माहिती दिली. या समितीने प्रत्येक जिल्ह्यात १० टक्के अपघात कमी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यासाठी सर्व विभागांनी, जनतेनी सहकार्य केले तर नांदेड जिल्ह्यातही अपघात कमी करता येतील असे सांगून श्री. कामत यांनी रस्ता सुरक्षा अभियाना मागचा उद्देश व विभागाची भूमिका विषद केली.

वाहतुकीपैकी ९० टक्के वाहतूक ही रस्त्याने
मोटार वाहन निरिक्षक मेघल अनासने यांनी अपघात बदल माहिती जनजागृती केली. अपघातामुळे देशाचे फार मोठ्या स्वरुपात वित्तहानी होत असून यामुळे आपल्या देशाच्या जिडीपीमध्ये तिन टक्के घट होत असल्याचे सांगितले. वाहतुकीपैकी ९० टक्के वाहतूक ही रस्त्यांने होत असते. उर्वरित १० टक्केमध्ये हवाईमार्गे व रेल्वे मार्गाने होत असते. या १० टक्के वाहतूकीमधील वाहनचालकांना त्यांना मिळणाऱ्या निर्देशानुसार काम करीत असतात. जी ९० टक्के वाहतूक रस्त्यावरुन होत असते. त्यांना कोणतीही निर्देश प्राप्त होत नसून ती स्वत: निर्णय घेऊन वाहतूक करित असतात. त्यामुळे या ९० टक्के वाहतूक करणा-या वाहन चालकांनी वाहन चालवित असताना रस्त्याच्या नियमाचे पालन करुन व त्यांचे लक्ष विचलीत न होता वाहतूक केली तर अपघातामध्ये फार मोठ्या प्रमाणात कमी करता येतील, असे सांगितले.
या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या वेळी रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेली रस्ता सुरक्षा माहिती पुस्तीका व रस्ता सुरक्षा माहितीचे ब्रोशरचे विमोचन उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या सप्ताहामध्ये जनजागृती म्हणून विविध ठिकाणी होणारे पथनाट्याचा कार्यक्रम यावेळी करण्यात आला. या पथनाट्याचे जिल्ह्यात विविध ठिकाणी वर्दळीच्यावेळी पथनाट्यामार्फत रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात येणार असल्याचे श्री राऊत यांनी माहिती दिली.

चित्ररथामार्फत जिल्हाभर जागृती
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने एक चित्ररथ तयार करण्यात आला असून उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर चित्ररथास प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. कामत व उपस्थित अधिकारी यांनी हिरवा झेंडी दाखवली. या चित्ररथामार्फत जिल्हाभर विविध ठिकाणी साऊंड सिस्टीम व बॅनरद्वारे जनजागृती करणात येणार असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले.

अनेकांची उपस्थिती
याप्रसंगी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण मोहन कलंबरकर, श्री. पुंडगे व प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. विविध संघटनांचे पदाधिकारी, ऑटोरिक्षा युनियनचे पदाधिकारी, वाहन चालक, मालक, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक व नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com