अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोककलांचाही जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढेमसा या आदिवासी नृत्याचे सादरीकरण करताना कलावंत.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोककलांचाही जागर

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी (उदगीर) - येथील नथमल शेठ इन्नाणी सभागृहात धर्मवीर ॲड. संग्राम अप्पा शेटकार व्यासपीठावर शुक्रवारी (ता. २२) लोककलावंतांचा लोकोत्सव उत्साहात पार पडला. यामध्ये राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या कलावंतांनी पारंपरिक लोककलेचा आविष्कार सादर केला.

यावेळी उपस्थितांना पारंपरिक कलेतून समाजातील विविध पैलूंचे दर्शन घडले. यात प्रामुख्याने वासुदेव, कुडमुडे जोशी, गोरख- मच्छिंद्र, भराडी, आराधी, पोतराज, वाघ्या मुरळी, गोंधळी, लमाण समाजातील धीरोधीरो नृत्य, पुरुष व महिलांचे लहेंगी लोकनृत्य, दंडार/घुसाडी आणि ढेमसा यासारख्या अनेक आदिवासी लोकनृत्याचे कलावंतांनी सादरीकरण केले. विविध लोककला पाहण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांनीही मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती दर्शवत लोककलेला भरभरून दाद दिली. यावेळी राज्यभरातील एकूण १६ प्रकारच्या लोककला सादर करण्यात आल्या.

Web Title: Awakening Of Folk Art

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top