पुरस्कारामुळे सांस्कृतिक वैभवात भर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

या वेळी ते बोलत होते. मनिंदरजितसिंह बिट्टा, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, लाचलुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षिका कल्पना बारवकर, महापौर दीक्षा धबाले, उद्योजक बालाजी जाधव, पत्रकार राजेंद्र हुंजे, प्रा. डॉ. साईनाथ शेटोड आदी उपस्थित होते.

नांदेड : जनसेवा करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार देण्याची परंपरा नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर पाडणारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

महिला दिनी पुरस्कारचे वितरण
मीमांसा फाउंडेशन, राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, ह्युमन राईट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिलादिनी कर्तृत्ववान महिलांचा कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार देऊन रविवारी (ता. आठ) गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. मनिंदरजितसिंह बिट्टा, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, लाचलुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षिका कल्पना बारवकर, महापौर दीक्षा धबाले, उद्योजक बालाजी जाधव, पत्रकार राजेंद्र हुंजे, प्रा. डॉ. साईनाथ शेटोड आदी उपस्थित होते.

हेही वाचा....कोरोना : पुण्यातून पळाले कुटुंब अन् लातूर पोलिसांची दमछाक

‘साम’च्या प्राची साळुंखे यांना महिला भूषण पुरस्कार 
या वेळी यात कुसुमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार ‘साम’ टीव्ही मुंबईच्या प्राची साळुंखे व प्रा. डॉ. प्रीती तोटावार यांना देण्यात आला. मुंबईच्या प्रा. डॉ. स्वाती भिसे, अनसूया गुप्ता, पुण्याच्या अनसूया उम्रजकर, कमल परदेशी व भद्रावतीच्या शाहिस्ता खान पठाण यांना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचलेच पाहिजे....विषाणू घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गोवऱ्या-

इतर मान्यवरांचा सन्मान
विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाने नावलौकिक मिळविणाऱ्या डॉ. आशा गुट्टे, श्रद्धा देशमुख, बालविकास अधिकारी गंगामणी गिरगावकर, डॉ. तुळजा अमृतवाड, मेकअप आर्टिस्ट कल्याणी हुरणे, राऊबाई बिरादार, चंद्रकला बोधगिरे, अपर्णा सावळे, शबाना बेगम, डॉ. माया चिखलीकर, महादा मोरे, लता बंदमवार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मीना झाडबुके, पंचफुला तारू, स्मिता रामदासी, अनुराधा नांदेडकर, विजयलता बत्तीन, सुनीता धुळगंडे, डॉ. भाग्यश्री नरवाडे, विद्या खानसोळे, मेनका डिल्स, वर्षा भोळे, समाजसेविका भारती राव, तर शेख हसिनाबी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रा. संतोष देवराये यांनी सूत्रसंचालन केले. रामेश्वर धुमाळ यांनी प्रास्ताविक केले, तर पत्रकार रूपेश पाडमुख यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The award emphasizes cultural glory, nanded news