स्थायीच्या हाजेरीपटावर ‘बॅक डेट’चा फंडा !

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या चार सदस्यांची विषय समितीच्या सभापतिपदावर निवड झाल्याने सदस्यसंख्या चारवर येऊन ठेपली. बुधवारी (ता.पाच) अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या बैठकीस पदाधिकारी वगळता, केवळ एक महिला सदस्या उपस्थित राहिल्या. इतर तीन सदस्यांच्या अनुपस्थिबाबत दबक्या आवाजत चर्चा सुरू असताना गुरुवारी (ता.सहा) प्रशासनावर राजकीय दबावतंत्राचा अवलंब करून ‘बॅक डेट’मध्ये दोन सदस्यांनी सह्या केल्या. स्थायीचा हाजेरीपट अद्यवत नसून ठिकठिकाणच्या खाडाखोडीची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी केली आहे.
 
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर सभागृहाच्या स्थायी समितीच्या एकूण ३० मासिक सभा झाल्या. स्थायीसह विषय समितीच्या पाच बैठकीस अनुपस्थित राहिल्यास सदस्याचे सदस्यत्व केले जाते. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर ॲड. रामराव नाईक, संजय बेळगे, सुशीला बेटमोगरेकर, बाळासाहेब रावणगावकर (विद्यमान सभापती) त्याचबरोबर पूनम पवार, ॲड. विजय धोंडगे, प्रवीण पाटील चिखलीकर, संतोष राठोड यांची निवड करण्यात आली आहे. समिती गठित झाल्यानंतर एकूण बैठकांपैकी पाच बैठकांना अनुपस्थित राहिल्यास त्या सदस्याचे सदस्यत्व रद्दचा सभागृहास घालून दिलेला नियम आहे; पण बुधवारी (ता. पाच) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीसाठी तीन सदस्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

हेही वाचा-Video - नांदेडात अशोक चव्हाणच ठरले भारी
  
हाजेरीपटावर ‘बॅक डेट’मध्ये सह्या -  
बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीस अनुपस्थितीमुळे सदस्यत्वावर गंडांतर येण्याची जाणीव होताच दोन वजनदार सदस्यांनी गुरुवारी स्थायीच्या हाजेरीपटावर ‘बॅक डेट’मध्ये सह्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदस्यत्व वाचवण्यासाठी त्या दोन सदस्यांनी प्रशासनावर राजकीय दबावतंत्राचा वापर करून हाजेरीपटावर मागील बैठकीत उपस्थिती दर्शविण्यासाठी ‘बॅक डेट’ मध्ये सह्या केल्या. त्यामुळे त्या सदस्यांचे सदस्यत्व कायम राहिले. 

रजिस्टर अद्यावत नाही -
स्थायी समितीच्या मासिक सह्यांच्या रजिस्टरमध्ये गंभीर चुका आहेत. बैठकीस उपस्थित नसलेल्या सदस्यांच्या रजिस्टरवर सह्या आहेत; पण तारखा नमुद नाहीत, तहकूब बैठकीची नोंद नाही. याशिवाय अनेक बैठकांमध्ये सदस्यांच्या सह्या नाहीत. स्थायी समितीच्या रजिस्टरमध्ये अशा गंभीर चुका होत असतील तर इतर समित्यांच्या प्रशासकीय कारभारावर शंका निर्माण होत आहे. स्थायी समितीचे रजिस्टर अद्यावत ठेवण्याची जबाबदारी निश्चित करून प्रकरणची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी केली आहे. 

सभा अहवालावरील शंका
स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांची सभा अहवालामध्ये नोंद केली जात नसल्याचा आरोप बुधवारी (ता. पाच) सदस्या पूनम पवार यांनी केला. समिती सदस्यांच्या हाजेरीपटावर ‘बॅक डेट’मध्ये सह्यांचे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाच्या सभाअहवालावर शंका निर्माण होत आहेत. दरम्यान, हाजेरीपटावरील उपस्थिती, खाडाखोड सभाअहवालाच्या तपासणीतून समोर येणार आहे; पण बैठकीतील मुद्देच सभाअहवालामध्ये नमूद करण्यात येत नसल्याचा सौ. पवार यांचा आरोप हाजेरीपटाच्या चौकशीतून समोर येणार आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com