Archana Gelada Resignsakal
मराठवाडा
Badnapur News : बदनापूरच्या नगराध्यक्षा अर्चना गेलडा यांचा अखेर राजीनामा; कोण होणार नवीन नगराध्यक्ष? यांच्या नावांची आहे चर्चा
बदनापूर नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होणार यात कुठलीच शंका नाही.
बदनापूर - बदनापूर नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष होणार यात कुठलीच शंका नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठेवलेल्या अजब धोरणानुसार चार नगरसेवकांना सव्वा - सव्वा वर्षे नगराध्यक्ष होण्याची संधी देण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षा अर्चना सत्यनारायण गेलडा यांनी पक्षादेशाचे पालन करीत बुधवारी (ता. चार) आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे पुढील सव्वा वर्षांसाठी नगराध्यक्ष होण्याची संधी कुणाला मिळेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थात नव्या नगराध्यक्ष पदासाठी चित्रा संतोष पवार आणि वैशाली विजय जऱ्हाड यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
