

Latur History Museum
sakal
लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातील इतिहास वस्तुसंग्रहालयात उपलब्ध असलेल्या ताम्रपटाचे वाचन करण्यात अखेर संशोधकांना यश आले आहे. बहामनी राजवट काळातील हा ताम्रपट वर्ष १५०७ चा असून, तेव्हा एका संघर्षात मरण पावलेल्या खंडागळे-जाधव यांच्या वारसांना मदत देण्याबाबतचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे तत्कालीन मराठी व मोडी लिपीतील ३० ओळींचा मजकूर असलेला हा ताम्रपट दोन पत्र्यांचा आहे.