esakal | तुळजा भवानी मातेच्या मंदीरात बैलपोळा सण साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

बैलपोळा

तुळजा भवानी मातेच्या मंदीरात बैलपोळा सण साजरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : तुळजा भवानी मातेच्या मंदीरात बैलपोळा सण सोमवारी ता.6 साजरा करण्यात आला. तुळजा भवानी मंदीरात बैलपोळा सण परंपरेने साजरा करण्यात आला. येथील तुळजा भवानी मातेच्या मंदीरातील मठाचे बैल कमानवेस येथील मारूती मंदीरापासून आणण्यात आले.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तुळजा भवानी मंदीरात बैलांची पुजा करण्यात आली. तसेच बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला. तुळजाभवानी मंदीरात मुख्य गाभार्यासमोर बैलांची पुजा करण्यात आली.

यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, तुळजा भवानी मंदीर समितीचे धार्मिक व्यवस्थापक सिद्देश्वर इंतुले आदी उपस्थित होते. तुळजाभवानी मंदीरात राजेशाही पद्धतीने सर्व उत्सव पार पडतात. बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी सर्व सेवेधारी तसेच प्रशासनातील कम॔चारी उपस्थित होते.

loading image
go to top