Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये नैसर्गिकरीत्या बहरणाऱ्या धारूरच्या रसाळ आणि मधुर सीताफळाला यंदा दुष्काळाची बसली झळ.
balaghat Custard Apple

balaghat Custard Apple

sakal

Updated on: 

- ईश्वर खामकर

किल्लेधारूर - बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये नैसर्गिकरीत्या बहरणाऱ्या धारूरच्या रसाळ आणि मधुर सीताफळाला यंदा दुष्काळाची झळ बसली आहे. पावसाअभावी झाडांवर अपेक्षित फळधारणा झालेली नसल्याने सीताफळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याचे चित्र आहे. उत्पादन घटल्याचा थेट फटका या हंगामावर अवलंबून असलेल्या मजुरांना बसणार असून, व्यापारी, बाजारपेठ आणि वनविभागाच्या महसुलावरही त्याचा परिणाम दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com