
पैठण तालुक्यातील बालानगरसह परिसरातील तांबे डोनगाव येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जावून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाहणी करून सरकारवर निशाणी साधला.
- कृष्णा गोर्डे
बालानगर - पैठण तालुक्यातील बालानगरसह परिसरातील तांबे डोनगाव येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांच्या बांधावर जावून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाहणी करून सरकारवर निशाणी साधला.
दरम्यान उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेनिमित्त युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील तांबे डोनगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्त कापुस, तुर, सोयाबीन, मोसंबीसह आदी पिकांची पाहणी करून या खोके घेऊन ओके झालेल्या सरकारला शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडु.शेतकऱ्यांनी धीर सोडु नये उध्दव ठाकरे व शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.पाहणी केल्यानंतर ते बालानगर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता आदित्य ठाकरे गावात येताच शिवसैनिकांनी पन्नास खोके,एकदम ओके अशा घोषणा देत सरकार विरूध्द रोष व्यक्त केला.
बालानगर येथील शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर कर्जमाफी मिळाली नाही, चालु बाकीत असणाऱ्यां शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर मदत मिळाली नाही, सरसकट पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशा विविध मागण्या केल्या. यावेळी आदित्य ठाकरे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते की, हे बिनबुडाचे सरकार असुन ह्या सरकारचे वाचाळविर मंत्री नुसते टिवटिव करत फिरत असुन हे शेतकऱ्यांविरोधी सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंग राजपुत, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पिवळ, तालुकाध्यक्ष मनोज पेरे, युवासेना तालुकाप्रमुख विकास गोर्डे, पैठण शहराध्यक्ष प्रकाश वानोळे, राजु परदेशी, महीला आघाडीच्या राखी परदेशी, सोमनाथ जाधव, उपतालुकाप्रमुख विजय नलावडे, अशोक धर्मे, रहेमान पठाण, नवनाथ चौधरी, राहुल राठोड, भागवत नलावडे, अभिषेक गोर्डे, संभाजी गोर्डे, यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव कातडे, सहायक फौजदार बाबासाहेब दिलवाले, गोपाळघरे, दाभाडे, डहाळे, राहुल मौतमल, तलाठी रमेश फटागंडे, कृषी सहाय्यक दत्ताञय भवर, ग्रामविकास अधिकारी नितीन निवारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.