teacher monali waghchaure
sakal
- ज्ञानेश्वर बोरूडे
लोहगाव - पैठण तालुक्यातील साईबाबांची प्रगटभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुपखेडा गावच्या सून सौ. मोनाली सुनील वाघचौरे यांनी खासगी शाळेत अल्प पगारावर नोकरी करताना घरातील कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्याचबरोबर प्रचंड जिद्द, चिकाटी, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर फावल्या वेळेत अभ्यासाचा ध्यास घेत त्यांनी पवित्र पोर्टल शिक्षक भरती परीक्षेत घवघवीत यश मिळविले. त्यांची नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड झाली आहे.