
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अद्ययावत आणि नावीन्यपूर्ण अशा संकेतस्थळाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. तीन) कार्यान्वित करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी, महाविद्यालये आणि नागरिकांसाठी चार स्वतंत्र टॅब ‘युजर फ्रेंडली’ व्यवस्था वेबसाइटवर करण्यात आली. नवीन संकेतस्थळ हे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले. वापरकर्त्याला आवश्यक माहिती पटकन मिळण्याची सुविधा करून सुरक्षेला प्राध्यान्य देण्यात आले आहे.